LIC PRIVATILIZATION | LIC चे खाजगीकरण नक्की झाले आहे का ? खाजगीकरण गुंतवणूकदारांना फायदेशीर कि तोट्याचे ?

 


LIC चे खाजगीकरण नक्की झाले आहे का ? खाजगीकरण गुंतवणूकदारांना फायदेशीर कि तोट्याचे ?

भारतीय आयुर्विमा महामंडळ चे खाजगीकरण होणार नसून, सरकार त्यातील काही टक्के हिस्सा विकणार आहे. त्यालाच निर्गुणतवनुक असे म्हणतात. मालकी सरकारचीच राहणार आहे. हा हिस्सा जो की साधारणपणे अंदाजे 25% असू शकतो, तो हिस्सा खाजगी गुंतवणूकदार म्हणजेच सामान्य जनतेला आई पी ओ च्या माध्यमातून विकणार आहे. आणि त्यातून सरकार सार्वजनिक खर्चाकरिता लागणारे भांडवल उभारणार आहे. म्हणजे 75% मालकी सरकारचीच राहणार आहे. खाली पहा सध्या भारतीय आयुर्विमा महामंडळ मधील सरकारचा हिस्सा हा 100% आहे.

या महामंडळाची गुंतवणूक तब्बल ३० लाख कोटी रुपये इतकी अफाट आहे. गेले 60 ते 70 वर्ष या महामंडळाचा विकास चालूच आहे पण कधी निर्गुंतावणुकीची वेळ आली नाही.एवढया प्रचंड व्यवसायाचे मूल्य ठरवणे हेच खूप अवघड काम आहे आणि नंतर त्याचे share market मध्य आयपिओ येईल.पण साधारण एल आय सी चे मूल्यांकन १० लाख कोटी येईल असा अंदाज अर्थतज्ज्ञ ्चा आहे.याच्या १०% आय पी ओ येईल म्हणजे सरकराल 1 लाख कोटी रुपये मिळतील .सध्या आर्थिक तंगी आणि येऊ घालणाऱ्या मंदीच्या पार्श्वभूमीवर सरकारला पैसे लागणार असल्यामुळे , हा निर्णय मोदी सरकारला काही काळ तारू शकतो.

खाजगीकरण गुंतवणूकदारांना फायदेशीर कि तोट्याचे ?

मुळात सरकारचे काम व्यापार /व्यवसाय करणे नसून राज्यकारभार करणे , उद्योगावर नियंत्रण ठेवणे हे आहे.त्याची सुरुवात १९९१ पासून मुक्त अर्थव्यवस्थेत दडली आहे. त्यामुळे सरकार आपल्या मालकीतले हिस्सेदारी कमी करते हे आपल्याला नवीन नाही.हीच योग्य वेळ आहे विक्री करायची कारण सध्या LIC ही आयुर्विमा उद्योगात अग्रस्थानी आहे.पण आधिक पैश्याच्या हव्यासापायी GIc. आणि न्यू इंडिया इन्शुरन्स चे ipo फसले तसे LIC चे फसायला नको.


टिप्पण्या