Marathi | Under the Krishi Karj Mitra Yojana, farmers will now get loans immediately | Agriculture loan,


कृषी कर्ज मित्र कर्ज  योजना अंतर्गत आता शेतकऱ्यांना मिळणार लगेच कर्ज

Kisan Mitra Application Form, MITRA scheme,Farmer Finance / Agriculture Loan/ Krishi Loan - ICICI Bank, ग्रामपंचायत वेबसाईट महाराष्ट्र, Krushi Karj Mitra Bharti,

 राज्यातील शेतकऱ्यांना वेळेवर पीक कर्ज (उपलब्ध करून देण्यासाठी ‘कृषी कर्ज मित्र’ही योजना सुरू करण्यात येणार आहे. ही योजना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे. कृषी कर्ज मित्र या संकल्पनेतून शेतकऱ्यांना कर्ज प्रकरण (करण्याच्या अडचणी पासून मुक्ती मिळणार आहे. प्रत्येक कर्ज प्रकरण करण्यासाठी व त्यांच्या कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी शेतकऱ्यांना होणारा त्रास यातून कमी होणार आहे. तर या संकल्पनेतून बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. काय आहे ‘कृषी कर्ज मित्र’ ही संकल्पना (आणि कशी मिळेल तरुणांना रोजगाराची संधी ते आपण पाहूया…

 

कृषी कर्ज मित्र योजना संदर्भातील जी. आर. बघा.

शेतकऱ्यांना अगदी वेळेवर व सहजरित्या कृषी कर्ज उपलब्ध व्हावे या दृष्टीकोनातून प्रत्येक जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने कृषी कर्ज मित्र योजना सुरु होत आहे आणि या संदर्भातील जी. आर. म्हणजेच शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेला आहे. शासनाचा हा जी आर बघण्यासाठी खालील बटनाला टच करा.

जी आर पाहण्यासाठी

कृषी मित्राचे कसे होते रजिस्ट्रेशन

 

v कृषी कर्ज मित्र म्हणून सेवा देऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीने जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावरनोंदणीकरावी.

v नोंदणी झालेल्या इच्छूक व्यक्तींची यादी तयार करून त्यास कृषी समितीची मान्यता घेण्यात येईल.

 

v जिल्हा परिषदेकडील कृषी समितीस अंतिम निवडीचे अधिकार राहतील.
कृषी कर्ज मित्राने ज्या शेतकऱ्यांना कृषी कर्जाची आवश्यकता आहे, त्यांना भेटी देऊन कर्ज प्रकरणाच्या कार्यपध्दतीची सविस्तर माहिती द्यावी.

 

v कृषी कर्ज मित्र कृषी कर्जासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे गोळा करून शेतकऱ्यांच्या संमतीने कर्ज यार करून मंजूरीसाठी बँकेमध्ये जमा करावा लागणार आहे.

 

v कृषी कर्ज मित्र हा बँक व शेतकरी यांच्यामधील मध्यस्थाच्या भूमिकेऐवजी सहायक व सल्लागाराची भूमिका बजावेल.

v कृषी कर्ज मित्राने पारदर्शी व प्रामाणिकपणे शेतकऱ्यांस सहाय्य व सल्ला देणे या विषयीचे बंधपत्र देणे आवश्यक आहे.

 

कृषी मित्रास काय फायदा ?

शेतकऱ्याचे कर्ज प्रकरणे मंजूर केल्यास

ü कृषिमित्राला मानधन स्वरुपात रक्कम देण्यासाठी एक तालुकास्तरीय समिती नेमण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ü यामध्ये गट विकास अधिकारी, सहायक निबंधक सहकारी संस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा प्रतिनिधी, जिल्हा अग्रणी बँकेचा प्रतिनिधी, तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी पंचायत समिती यांचा समावेश राहणार आहे. 

टिप्पण्या