घरातले गृहिणी वैयक्तिक कर्जाने व्यवसाय सुरू करू शकतात?


घरातले गृहिणी  वैयक्तिक कर्जाने व्यवसाय सुरू करू शकतात?

आता सध्या घरातील गृहिणी हि यशस्वी लघु व्यवसायही चालवते,हि संख्या खूप प्रमाणात वाढत आहे. . परंतु यशस्वी  उद्योजक होण्याच्या स्पप्न पूर्ण येण्यासाठी या गृहिणी एक सर्व सामान्य समस्येला तोंड द्यावे लागत आहे ते म्हणजे  व्यवसाय सुरू करण्यासाठी सुरुवातीचा निधी.मग यासाठी प्रश्न उभा राहतो तो म्हणजे घरातले गृहिणी  वैयक्तिक कर्जाने व्यवसाय सुरू करू शकतात?

आधुनिक गृहिणी या खूप  महत्वाकांक्षी आहेत यशस्वी  उद्योजक होण्याच्या स्पप्न सह ते आपल्या घरातल्या जबाबदार्याही हि संतुलित करत आहेत.आपण हि गृहिणी आहात आणि आपणास हि आपला उद्योग चालू करायचा आहे तर या साठी आपल्याकडे एक मजबूत व्यवसाय नियोजन असणे आवश्यक आहे . ठोस व्यवसाय योजनेव्यतिरिक्त सर्वात महत्वाची बाब म्हणजे प्रारंभिक निधी.

आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याकडे पुरेशी आर्थिक स्त्रोत नसतील तर आपल्याला  व्यवसायाच्या कल्पनेसाठी  बाह्य स्रोतांवर अवलंबून रहावे लागेल.
बाह्य स्त्रोत म्हणजे नक्की कोण .तर बँका..

बँकेला वैयक्तिक कर्जासाठी आपला  कर्ज अर्ज मंजूर होण्यासाठी  पात्रता काय आवश्यक आहे ..

वैयक्तिक कर्ज  अर्ज मंजूर करण्यासाठी कर्जदाराला सर्वात महत्वाची बाब म्हणजे अर्जदाराचे उत्पन्न. बँकेला  खात्री व्हायला हवी कि   अर्जदाराकडे स्थिर उत्पन्नाचा स्रोत आहे,ज्याद्वारे तो कर्जाचे हफ्ते वेळेवर भरू शकतो. 

दुर्दैवाने, ज्या गृहिणी ज्यांना व्यवसाय सुरू करण्याची इच्छा आहे पण स्थिर उत्पनाचा स्त्रोत त्यांच्याकडे नाहीये.अश्या गृहिणीचा वैयक्तिक कर्जाचा अर्ज नाकारला जावू शकतो
जर आपलीही स्थिती अशी असेल तर आपल्यांसाठी काही मार्ग आहे ते जाणून घेवू

गृहिणींसाठी कर्जाचे पर्याय

हे पर्याय पुढीलप्रमाणे

v  सह-अर्जदारासह वैयक्तिक कर्ज

आपल्याकडे वैयक्तिक कर्जासाठी मंजूर होण्यासाठी उत्पन्नाचा स्थिर स्त्रोत नसला तरीही आपल्या सह-अर्जदारासह म्हणजे  आपला जोडीदार, पालक, भावंड किंवा मुलाचा उत्पनाचा आर्थिक स्थिर स्त्रोत जोडून  आपण नवीन व्यवसाय कर्जासाठी अर्ज भरू शकता.
आपल्या अर्जाकडे आता स्थिर-उत्पन्नाचा स्त्रोत असलेला सहकारी-अर्जदार असेल, तर आपण बँकेकडे आपल्या वैयक्तिक कर्जासाठी नक्की अर्ज करू शकता.

v  कर्ज गॅरंटर जोडा

आपल्याला वेळेवर कर्जाची परतफेड करण्यात आपला व्यवसाय भविष्यात पर्याप्त कमाई करेल याची आपल्याला खात्री असल्यास आपण सह-अर्जदाराच्या जागी जामीनदार जोडण्याच्या पर्यायावर विचार करू शकता. गॅरंटर स्थिर उत्पन्नाचा स्रोत आणि उत्कृष्ट क्रेडिट स्कोअर असणारी एखादी व्यक्ती असू शकते.
जर आपण कर्जाची परतफेड करण्यास अक्षम असाल तर आपल्या कर्जाची परतफेड करण्याची लेखी हमी जबाबदारी आपला  कर्ज गॅरंटर बँकेकडे देतो.
v  सुरक्षित कर्ज

वैयक्तिक कर्ज एक असुरक्षित कर्ज आहे म्हणजे विना तारण व जमीनदार .. ज्यासाठी आपल्याला कर्जाच्या रकमेविरूद्ध कोणतीही संतारण  किंवा सुरक्षितता ठेवण्याची आवश्यकता नसते.

 परंतु आपण वैयक्तिक कर्जाच्या  असुरक्षित कर्जासाठी पात्र नसल्यास आपण गोल्ड लोन किंवा मालमत्ता गहाण ठेवून  सुरक्षित कर्जाचा विचार करू शकता.

हे आपल्याला आपले सोने, मालमत्ता, इक्विटी किंवा बाँड्स कर्जाच्या रकमेच्या विरूद्ध तारण म्हणून ठेवून कर्ज मिळविण्यास अनुमती देईल

v  सरकारी योजना

वरीलपैकी कोणताही पर्याय आपल्या आवश्‍यकतेनुसार नसेल तर अशा काही सरकारी पर्सनल लोन योजना देखील आहेत ज्यांचा आपण विचार करू शकता. उदाहरणार्थ, महिला किंवा उद्योग योजनेसाठी आपण प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत कर्जासाठी अर्ज करू शकता.

या योजना गृहिणींना छोट्या व्यवसायासाठी वैयक्तिक कर्ज मिळवून देतात. या सरकारी योजनांविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आपण एका  बँकेचा सल्ला घेऊ शकता.

वरील पर्यायासह आपण वैयक्तिक कर्जासह आपले उद्योजक होण्याचे  स्वप्न नक्की पूर्ण कराल.

टिप्पण्या